यॉर्क विद्यापिठाच्या प्रदर्शनात गांधी रिसर्च फाउंडेशनचा सहभाग

जळगाव प्रतिनिधी । लंडन येथील यॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये आयोजीत आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व व्याख्यानमालेत जळगावच्या गांधी रिसर्च फाउंडेशनचा सक्रिय सहभाग घेतला.

महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा काढून १२ मार्च १९३० रोजी मीठाचा सत्याग्रह सुरू केला. ही घटना शतकी वर्षाकडे वाटचाल करीत आहे. या औचित्याने लंडन येथील यॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व व्याख्यानमाला आयोजीत करण्यात आली होती. यात जळगावच्या गांधी रिसर्च फाउंडेशनचा सक्रिय सहभाग होता. या उपक्रमासाठी छायाचित्रे व दस्तावेज गांधी फाऊंडेशनमार्फत पुरविण्यात आला.

फाऊंडेशनचे के. प्रो. गीता धरमपाल आणि संपादक डॉ. आश्‍विन झाला यांनी दांडी यात्रा व मीठाच्या सत्याग्रहाचे वैश्‍विक प्रभाव याबद्दल ऑनलाइन मार्गदर्शन केले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाइन आयोजीत करण्यात आला होता. या प्रदर्शनाकरिता यॉर्क युनिव्हर्सिटीचे प्रो. माइल्स टेइलरयांनी जानेवारी २०२० मध्ये जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशनला भेट दिली होती. त्या दरम्यान संग्रहालय आणि अभिलेखागाराचे अवलोकन केल्यानंतर गांधी रिसर्च फाउंडेशनला त्यांच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता आवाहन केले.

या कार्यक्रमात जगभरातील अनेक देशांतील लोक सहभागी होते. डॉ. अश्‍विन झाला यांनी व्याख्यानात महात्मा गांधीजी यांच्या या आंदोलनानंतर इतर देशांमध्ये काय परिणाम झाला याबाबत विवेचन केले.

Protected Content