दिवाळीपूर्वी बोनससाठी सहाय्यक कामगार आयुक्तांच्या बंद कार्यालयाबाहेर आंदोलन(व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । दिवाळी बोनस मिळण्यापासून वंचित सीएमवायके प्रेस व मल्हारा ऑफसेट कंपनीतील कामगारांना दिवाळीपूर्वी बोनसच्या मागणीसाठी कामगारांचे सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर सेंटर ऑफ ट्रेड युनियनतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.

औद्योगिक वसाहतीतील सीएमवायके प्रेस व मल्हारा ऑफसेट कंपनीतील कामगारांनी दिवाळीपूर्वी कामगारांना २० टक्के बोनस द्यावा अशी मागणी करून देखील कामगारांना बोनस मिळालेला नाही. बोनस अधिनियमानुसार ३० नोव्हेंबरपूर्वी देणे बंधनकारक असतांना देखील व्यवस्थापनाने अद्याप बोनस हेतुपुरस्सर दिरंगाई करणाऱ्या व सणासुदीच्या काळात कामगारांच्या कुटुंबाच्या आनंदावर विरजण घालणाऱ्या व्यवस्थापनावर सहाय्यक कामगार आयुक्त यांनी कारवाई करावी अशी मागणी करण्यासाठी सेंटर ऑफ ट्रेड युनियनचे सदस्य कॉ. विजय पवार यांच्या नेतृत्वात कार्यालयात गेले असता शासकीय सुटी असल्याने कार्यलय बंद होते. या बंद कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी प्रदीप वाणी, विलास सोनवणे, नारायण देसले, ज्ञानेश्वर पाटील, सैय्यद अजमल, राजेंद्र सोनवणे, सोपान शिंदे, जनार्दन अपराज, किरण सूर्यवंशी, ज्ञानेश्वर इंगळे, रवींद्र सोनवणे, गफ्फार शेख आदी उपस्थित होते.

लिंक 1 : https://www.facebook.com/508992935887325/videos/291078135460698

लिंक 2 : https://www.facebook.com/508992935887325/videos/3464086370311647

Protected Content