किरकोळ कारणावरून तरूणावर धारदार वस्तूने वार

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नागसेननगर येथील इलेक्ट्रिक डीपीजवळ पायी जाणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला किरकोळ कारणावरून एकाने धारदार वस्तूने वार करून हातावर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत बुधवार १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुकेश रोहिदास झाल्टे (वय-२६) रा. नागसेन नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी १८ ऑक्टोबर रोजी ५.३० वाजेच्या सुमारास तो त्याची भाचीला क्लासला सोडण्यासाठी पायी जात असताना कॉलनीतील इलेक्ट्रिक डीपीजवळ बसलेला गोपाल देवकर (पूर्ण नाव माहित नाही) बसलेला होता. त्यावेळी मुकेश म्हणाला की, ‘तुम्ही इथे नशा पाणी करत जाऊ नका, लोकांना त्रास होतो’ असे बोलण्याचा राग आल्याने गोपाल देवकर याने त्याच्या हातातील धारदार वस्तूने मुकेश झाल्टे याच्या उजव्या हाताच्या पंजावर मारून दुखापत केली व शिवीगाळ केली. बुधवार १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता मुकेश झाल्टे याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गोपाल देवकर (पूर्ण नाव माहित नाही) रा. नागसेन नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे.

Protected Content