आदिवासी पाडा लसुनबड्रीत ‘शेतकरी परिसंवाद’ संपन्न

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज | तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाडा लसुनबर्डी-  सावखेडा सिम येथे नुकतेच कृषी विभागाच्या वतीने ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या अभियानांतर्गत शेतकरी परीसंवादाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमास जळगाव जिल्हा कृषि अधीक्षक संभाजी ठाकुर, तालुक्याचे प्रभारी कृषी अधिकारी सागर सिनारे, कृषी विस्तार अधिकारी धिरज नेहेते, कृषी अधिकारी किशोर देवराज, कृषी पर्यवेक्षक प्रकाश कोळी, कृषी सहायक कैलास बारेला, रवींद्रसिंग जाधव यांची उपस्थिती होती.

या प्रसंगी सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापन संभाजी ठाकूर यांनी शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.  कापूस व संत्रा फळपीक पाहणी कीड व रोगांचे  निरीक्षण व त्यावरील उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व समस्या या विषयी परिसंवादात चर्चा करण्यात आली. तसेच विशाल पाटील डी.एम.जळगाव यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना कीड व रोग व्यवस्थापन बद्दल माहिती दिली. अजित सीड्स प्रा. लि. च्या वतीने उपस्थित शेतकरी बांधवांना फेरोमन सापळे वाटप व फेरोमन सापळे प्रात्यक्षिक करून दाखवले.

कृषि विभागामार्फत उपस्थित प्रत्येक महिला शेतकरी व इतर शेतकरी बंधूंना पाच टक्के निंबोळी अर्क पाच लिटर कॅन वाटप करण्यात आले. आत्मा अंतर्गत शेतकरी गट प्रमाणपत्र जिल्हा कृषी अधिक्षक संभाजी  ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

Protected Content