श्री मनुदेवी नवरात्री उत्सवास दिनांक २६ सप्टेंबरपासून प्रारंभ

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज | तालुक्याच्या उत्तरेस असलेल्या सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेल्या खानदेशचे कुलदैवत असलेल्या सातपुडा निवासनी श्री मनुदेवी माता मंदिराच्या, नवरात्री उत्सवास सोमवार, दिनांक २६ सप्टेंबरपासून सुरुवात होत असून मंदिर समितीच्या वतीने यात्रेनिमित्त आणि संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे.

आज रविवार, दि. २५ सप्टेंबर रोजी दुपारी पोलीस प्रशासनासह संबंधित विभागाची मंदिरावर पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. कोरोना संसर्गाच्या गोंधळलेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळा नंतर यावर्षी नवरात्री उत्सवात देवीच्या दर्शनार्थ संपूर्ण राज्यातील भाविकांची गर्दी राहणार असल्याने मंदिर समिती, महसुल व पोलीस प्रशासना आणि वनविभागाच्या वतीने आज रविवारी दिनांक २५ सप्टेंबर २o२२ रोजी सकाळी ११ वाजता मंदिरावर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

तालुक्यातील श्री मनुदेवी मंदिरावर नवरात्री उत्सवाचे निमित्ताने महसूल विभाग, पोलीस प्रशासन ,वनविभाग, एस.टी.आगार ,आरोग्य विभाग , बांधकाम विभाग या संबंधित विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष शांताराम पाटील यांनी उत्सव काळात  मंदिरावर दैनंदिन पूजेसह अष्टमीला होम हवनाचे आयोजन केले जात असल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी उत्सव काळात  मंदिरासह ,वाहनतळ तसेच  विविध ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.

मंदिराचे अलीकडे सुमारे चार किलोमीटर अंतरावर वाहन तळ राहणार असल्याने वाहन तळापासून तर मंदिराचे पायथ्यापर्यंत खाजगी वाहनांना बंदी असेल वाहन तळापासून एसटीने भाविकांना पायथ्यापर्यंत येता येईल त्यासाठी एस टी महामंडळाचे आगार प्रमुख जितेन्द्र जंजाळ यांनी पुरेशा एसटी बसेस चे नियोजन केले असल्याचे सांगितले यावल आगाराच्या 25 बसेस सह जिल्ह्यातील चोपडा अमळनेर भुसावळ रावेर जळगाव या आगाराच्या बसेसही यात्रे निमित्त भाविकांसाठी यात्रास्थळी सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते श्रीमनुदेवी मंदीर संस्थेचे विश्वस्त शिवाजी पाटील, निळकंठ चौधरी ,सोपान वाणी, भास्कर पाटील, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील,   गिरडगावचे पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक पाटील, किनगावचे सचिन नायदे यांचे सह पश्चिम विभागाचे वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे , मंदीर संस्थांचे विश्वस्त शिवाजी पाटील, निळकंठ चौधरी, सोपान वाणी ,भास्कर पाटील, उपस्थित होते.

आकर्षक रोषणाई –

नवरात्री उत्सव निमित्ताने आईच्या मंदिरावर, आकर्षक रोशणाई केली आहे. यात्रे निमित्ताने विविध दुकाने परिसरात थाटली आहेत. यावर्षी पावसाळा चांगला झाल्या असल्याने सातपुडा पर्वत हिरव्यागार वनराईने नटलेला आहे मंदिर परिसरातील धबधबा सुरू असल्याने तसेच हिरवीगार वनराई भाविकांचे व पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Protected Content