‘चांगला स्पर्श-वाईट स्पर्श’ विषयावरील कार्यशाळेत ४०० शिक्षकांचा सहभाग

 

 

 

 

 

 

 

426536c6 0e9b 4269 9405 e7e1066e3ef2

चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील वसुंधरा फाउंडेशनतर्फे टाइम्स फाऊंडेशन व चाइल्ड लाईन या संस्थांच्या सहकार्याने येथे ‘मासूम’ या बाल लैंगिक अत्याचार विषयावर आधारित उपक्रमा अंतर्गत तालुक्यातील सर्व प्राथमिक आणि  माध्यमिक शाळेतील शिक्षक व प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन आज (दि. १४) करण्यात आले होते.

 

तालुक्यातील शिक्षक व प्रतिनिधींना ‘चांगला स्पर्श-वाईट स्पर्श’ याबाबत विद्यार्थ्यांना शिक्षीत कसे करावे? यासंदर्भात प्रशिक्षण या कार्यशाळेत दिले गेले. या प्रशिक्षित शिक्षकांनी यानंतर त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना या विषयावर प्रशिक्षण द्यावयाचे आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण होऊन बाल लैंगिक शोषणाच्या घटना टाळण्यासाठी मदत होईल. अश्याप्रकारे प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होऊन बाल लैंगिक अत्याचार रोखता येवू शकतील. या कार्यशाळेला उमंग सृष्टी परिवाराच्या संस्थापक सौ. संपदा पाटील, पंचायत समिती सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, दिनेश बोरसे, देवेन पाटील, सुनील भामरे व सचिन पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचलन गजानन मोरे यांनी केले.

Add Comment

Protected Content