राष्ट्रवादी कार्यालयात ‘वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा’; विकास लवांडे यांचे मार्गदर्शन ( व्हिडीओ )

0

NCP

जळगाव (प्रतिनिधी)। जळगाव लोकसभा मतदार संघासाठी आपला उमेदवार यावा यासाठी राष्ट्रवादी कार्यालयात ‘वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा’चे आयोजन करण्यात आले. वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेत राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ता सेलचे सरचिटणीस विकास लवांडे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी या कार्यशाळेत माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रभैय्या पाटील, अल्पसंख्याकचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफार मलीक, कार्याध्यक्ष विलास पाटील, काँग्रेस आयचे महानगराध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, राष्ट्रवादी कॉग्रेसचे खान्देशचे प्रवक्ते योगेश देसले, अनिल भाईदास पाटील, खलील देशमुख, महानगराध्यक्ष नामेदवराव चौधरी, रा.काँ.महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, जिल्हा समन्वयक विलास पवार, सेवादलचे जिल्हाध्यक्ष वाय.एस.महाजन, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, महानगराध्यक्ष युवक अध्यक्ष अभिषेक पाटील, कॉग्रेस आयचे सरचिटणीस अजाबराव पाटील, कॉग्रेसचे उपाध्यक्ष सचिन सोमवंशी, प्रमोद पाटील, विजयाताई पाटील, मंगलाताई पाटील, मिनल पाटील, प्रतिभा शिरसाट यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आयचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमात वक्ते यांनी विविध विषयांवर कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!