Home Cities जळगाव दिव्यांच्या रांगांनी उजळून उठला गणेश घाट; पितरांच्या मोक्षप्राप्तीसाठी केली प्रार्थना (व्हिडीओ)

दिव्यांच्या रांगांनी उजळून उठला गणेश घाट; पितरांच्या मोक्षप्राप्तीसाठी केली प्रार्थना (व्हिडीओ)

0
133


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज | सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांच्या मोक्षप्राप्तीसाठी नातेवाईकांनी मेहरूण तलावावर दिवे लावण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. यामुळे गणेश घाटावर दिव्यांचे विहंगम दृश्य पहावयास मिळालं.

सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पाण्यात दिवे सोडून प्रार्थना केल्यास पितरांना स्वर्गात जागा मिळून मोक्ष प्राप्त होतो. या धारणेवर विश्वास ठेऊन मेहरूण तलावावर आबाल वृद्धांसह कुटुंबाकडून प्रार्थना करण्यात आली. यावेळी दिव्यांच्या रांगांनी गणेश घाट उजळून निघाला होता.

याप्रसंगी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्यामुळे मेहरूण तलावाच्या गणेश घाटाकडे जाणार्‍या तसेच जळगाव ते पाचोरा महामार्गावर सुमारे तासभर मोठ्या प्रमाणात ट्रॅफीक जाम झाली. यावेळी दोन्ही बाजूंनी लांबवर वाहनांच्या रांगा लागल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाल्याचे दिसून आले.



Protected Content

Play sound