ब्रेकींग : बहुरूपीया तिघांचा घरात घुसून जबरी चोरीचा प्रयत्न

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तृतीयपंथीयांची वेशभूषा केलेल्या तीन जणांनी थेट घरात घुसत जबरी चोरी लूट केल्याची घटना रविवारी २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता समोर वाटिका आश्रम परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बहुरूपीया तीन तरुणांना नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केल आहे. शेवटचे वृत्त हाती तेव्हा जळगाव तालुकापोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू हाते.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंगात साडी घातलेले तीन तरुण रविवारी २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास जळगावातील वाटिकाश्रम परिसरात पैसे मागत फिरत होते, एका घरात मुलगी एकटी असल्याची संधी साधत, तिघांपैकी एकाने मुलीचा गळा दाबून तिला घरातून पैसे आणायला लावले, आरडाओरड झाल्यानंतर तिघेही पळून दुसऱ्या भागात गेले, त्या ठिकाणी तिघे एका घरात घुसले, व घरातील एकाला पैसे मागितले. त्याने पैसे देण्यासाठी पाकीट हातात घेतले असता, तिघांनी त्याचे पाकिट हुसकावून बळजबरीने १ हजार रुपये काढून घेतले. तिघेही दमदाटी करून जबरी लुट करत असल्याचे समोर आल्यानंतर नागरिकांनी त्यांना पकडून बेदम चोप दिला. व घटनेची माहिती तालुका पोलिसांना देऊन तिघांनाही पोलिसांच्या स्वाधीन केले.

भरदिवसाच्या या घटनेने जळगाव एकच खळबळ उडाली असल्याचा पाहायला मिळालं. मुले पकडून पळवून नेणारी असल्याच्या संशयावरूनही या परिसरात गोंधळ उडाला होता तसेच नागरिकांची एकच गर्दी झाली होती. घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा तरूणांनी ज्यांच्या ज्यांच्याकडून पैसे घेतले होते ते पैसे परत करण्यात आले असून याबाबत जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

Protected Content