पी.जे. रेल्वेमार्गाचे लवकरच ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होणार : ना.रावसाहेब दानवे (व्हिडीओ)

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या पाचोरा-जामनेर-बोदवड रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होणार असून या रेल्वेमार्गाच्या कामाला लवकर सुरूवात होणार आहे, असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.

जामनेर येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत रविवारी २५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता सेवा समर्पण अंतर्गत कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. आयोजित कार्यक्रमात प्रथम पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दानवे यांचे स्वागत केले. पुढे बोलतांना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, राज्यामधील रेल्वेचा विकास साधण्यासाठी आपण वेळोवेळी नियोजन करीत असून संपूर्ण राज्यभरामध्ये अनेक रेल्वे गाड्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील विविध विकास कामांना भर देण्यासाठी राज्य सरकार तत्पर असल्याचे सांगितले.

याप्रसंगी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, आमदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे, भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश धनके, उपजिल्हाध्यक्ष पद्माकर महाजन, नगराध्यक्ष साधना महाजन, महेंद्र बाविस्कर, जितेंद्र पाटील, माजी जि.प. अध्यक्ष दिलीप खोडपे, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, गटनेता डॉ. प्रशांत मुंडे, यांच्यासह जिल्हाभरातील भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Protected Content