महापालिका अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराने नागरिक त्रस्त – अनंत जोशी (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  अमृत योजनेच्या नावाखाली बनविलेले रस्ता महापालिकेकडून फोडले जात आहे. या भोंगळ कारभारामुळे नागरीक त्रस्त झाली आहे. येत्या आठ दिवसांत वार्डातील कामे संपवावी, त्यानंतर केलेला काँक्रीटीकरणाचा रस्ता जर फोडला तर मी त्याला फोडेन, असा इशारा नगरसेवक बंटी जोशी यांनी सोमवार २ मे रोजी दुपारी महापालिकेत आयोजित पत्रपरिषदेत दिला आहे.

 

जळगाव महापालिकेत नगरसेवक बंटी जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जळगाव शहरात भुयारी गटारी आणि अमृत योजनेचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. अजून किती दिवस सुरू राहणार आहे हे माहित नाही. परंतू महापालिकेतील अधिकाऱ्यांचे या कामाबाबत समन्यवय आणि नियोजन नसल्याने अमृत योजना कामाच्या नावाखाली डांबरीकरण केलेला रस्ता किंवा काँक्रीटीकरण केलेला रस्ता फोडला जात आहे. जळगाव महापालिकेतील अधिकारी व ठेकेदार यांच्यात समन्वय नाही. आणि समन्वय नसल्याने अमृत योजनेच्या पाईप लाईन टाकण्यासाठी चांगला रस्ता फोडला जात आहे.

बंटी जोशी पुढे म्हणाले की, माझ्या वार्ड क्रमांक १२ मध्ये गेल्या २० वर्षांपासून रस्ते नसल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि महापौर जयश्री महाजन यांचा पाठपुरावा करून निधी उपलब्ध केला. या निधीतून दोन रस्त्यांचे डांबरीकरण झाले आता इतर दोन ते तीन रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जणार आहे. दरम्यान, दोन रस्त्यांची नुकतेच डांबरीकरण करण्यात आले होते. आता तेच रस्ते अमृत योजनेचे काम अपुर्ण असल्याचे कारण सांगून महापालिकेकडून उकरून काढले जात आहे.  हा प्रकार अतिशय संतापजनक आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यामुळे महापालिकेने माझ्या वार्डातील अमृत योजनचे काम येत्या आठ दिवसात संपवावे अन्यथा मी महापालिकेच्या परिसरात सतरंजी टाकून आंदोलनाला पुकारेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.  तसेच माझ्या वार्डातील अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्यावर  मी माझ्या वार्डातील रस्ता काँक्रीटीकरणाचे कामाला सुरूवात करणार आहे. त्यानंतर जर कुणी अधिकाऱ्याने किंवा ठेकेदाराने अमृत योजनेच्या नावाखाली रस्ता फोडला तर मी त्याला फोडेन, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/5189145954457483

 

Protected Content