खून प्रकरणातील चोरीचा ट्रक घेणारे तिघे अटकेत

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ट्रकची चोरी करून क्लिनरचा खून केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील चोरीचा ट्रक घेणाऱ्या तीन जणांना जळगावातून एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फरीद मोहम्मद शफीक मोहम्मद (वय-३५) रा. शहाजनाबाद भोपाल, मध्यप्रदेश यांच्या मालकीचा ट्रक (एमपी ०४ एचई २९१५) हा १२ जुलै २०१६ रोजी भोपाल येथील अग्रवाल पेट्रोल पंपजवळ लावलेला होता. त्यावर क्लिनर गुलाबसिंह हा होता. १२ जुलै ते १३ जुलै दरम्यान मध्यरात्री हा ट्रक चोरीस गेला होता. तर क्लिनर गुलाबसिंग देखील मिसींग होता. निशातपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

 

या गुन्ह्यात लखनसिंग उर्फ नथनसिंग विश्वकर्मा रा. ग्रामपट्टन, समशाबाद जि. विधया, मध्यप्रदेश, सराजखान असमतखान (वय-४२) रा. पालकमंदीर हायस्कूल शहाबाजार औरंगाबाद आणि संतोष सोनी उर्फ नितेश ओंकार सोनी रा. सनावत भोपाल मध्यप्रदेश या तीन जणांना अटक करण्यात आली. दरम्यान यांनीच ट्रक चोरी करून क्लिनर गुलाबसिंग याचा खून केल्याची कबुली दिली आणि चोरीचा ट्रक जळगाव येथील यासीन खान मासुम खान मुलतानी, अरबाज यासीनखान मुलतानी, निजामखान मासुमखान मुलतानी तिघे रा. गणेशपुरी, मास्टर कॉलनी, चाकलक अफजल उर्फ गुड्डू रा. जळगाव यांनी विकल्याचे सांगितले. दरम्यान, या चौघांपैकी १६ डिसेंबर २०२० रोजी यासीनखान मासूम खान मुलतानी याला अटक करण्यात आली होती तर इतर तिघे फरार होता.

 

दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी हे जळगाव असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली, त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पोलीस नाईक इम्रान सैय्यद, मुद्दस्सर काझी, किशोर पाटील, सचिन पाटील, साईनाथ मुढे यांनी कारवाई करत तीन जणांना अटक केली. पुढील कारवाईसाठी तिघांना भोपाल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

Protected Content