यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन व प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) सभागृहात आयोजित या कार्यक्रमात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याला अभिवादन केले.
मंगळवार, २२ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.१० वाजता झालेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करत सार्वजनिक जीवनातील योगदान, सामाजिक बांधिलकी आणि विकासाभिमुख कार्याचा गौरव केला. यावेळी वक्त्यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांनी राज्याच्या विकासासाठी दिलेले योगदान, सर्वसामान्य जनतेप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि लोकाभिमुख नेतृत्व यांचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या विचारांचा आणि विकासाच्या दृष्टिकोनाचा प्रसार प्रत्येक घराघरात व गावागावात करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रियपणे कार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भगतसिंग पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष कदीर खान, युवा नेते ॲड. देवकांत पाटील, राष्ट्रवादी ग्रामीण कार्याध्यक्ष जितेंद्र सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा पीक संरक्षण संस्थेचे चेअरमन विनोद पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश चोपडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका सरचिटणीस प्रा. अर्जुन पाटील, कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल, माजी उपसरपंच समाधान पाटील (नावरे), अशोक पाटील, अक्षय बोरवले, मोहसीन खान, प्रदीपसिंग राजपूत यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याचा आदर्श समाजापर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत नेण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रम शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



