संत गजानन महाराजांची पालखी परतली स्वगृही

खामगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी वारी करून पायी प्रवासाने दोन महिन्यांनी शेगावी पोहोचली. 53 वर्षांपासून अव्याहतपणे जाणारा संत गजानन महाराज पालखी सोहळा नगरमध्ये दाखल होताच भाविकांनी जल्लोषात स्वागत केले.

यंदा पहिल्यांदाच दोन वर्षानंतर पंढरपूर वरून श्रींच्या पायदळ वारीचे आगमन झाल्याने भाविकांना प्रचंड उत्साह होता .कारण दोन महिन्यानंतर श्री चे संस्थांची पालखी संतनगरात पोहोचली. मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे भाविक भक्तांना या सोहळ्यापासून मुकले होते.

खामगावचे ते शेगाव या 16 किलोमीटर अंतरावर लाखो भक्तांचा भक्ती सागर श्रींच्या पालखी सोबत पहावयास मिळाला. पहाटे चार वाजेपासून भावीक खामगाव पायदळ वारी करत शेगावी दाखल होत होते. पालखी आगमनाच्या निमित्ताने जवळपास अडीच लाख भाविकांच्या मानवी साखळीचे दर्शन झाले.

दुपारी दोन वाजता श्रींच्या पालखीचे नगर परिक्रमा करता सुरू झाल्यानंतर भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा दर्शनाकरता रीघ होती ध्वज, पताका तोरणे कमानी, लावून शहर सजनात आले होते. पण मुख्य जेव्हा मंदिरात संध्याकाळी सहा वाजता पालखी पोहोचली दीड तास नामस्मरण कीर्तन आणि मुख्य रिंगण सोहळा सर्वांचे डोळ्याचे पारने नेय परिसर मंत्रमुग्ध झाला होता याच रिंगण सोहळ्याचे एक्सप्लूजी क्षणचित्रे प्रेक्षकांकरता खास करून आणले आहे.

जवळपास 600 ते 700 पताकाधारी वारकऱ्यांचे हे रिंगण सोहळ्याची दृश्य आपल्या डोळ्यात टिपण्या करता हजारो भाविक मंदिराच्या परिसरात एकत्रित आले होते.

Protected Content