‘तंबाखू मुक्त शाळा’ उपक्रम : प्राथमिक विद्या मंदिर शाळेचा गौरव

WhatsApp Image 2019 09 19 at 4.35.53 PM

जळगाव, प्रतिनिधी | येथील पंचायत समिति शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाउंडेशन या संस्थेतर्फे तंबाखू मुक्त शाळा या कार्यशाळेत प.न.लुंकड शाळेत आयोजन करण्यात आले होते.  यात मानव सेवा मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिर शाळेला तंबाखू मुक्त शाळाअभियान यशस्वीपणे राबविल्याने गौरविण्यात आले.

संपुर्ण जळगाव जिल्हाभर ‘तंबाखू मुक्त शाळा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात मानव सेवा मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिर जळगाव या शाळेने तंबाखू मुक्त शाळाअभियान यशस्वीपणे राबवल्यामुळे गटशिक्षणाधिकारी सतिश चौधरी यांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका माया अंबटकर व तंबाखू मुक्त अभियान प्रमुख शिक्षक सुनिल दाभाडे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी शिक्षणविस्तार अधिकारी रविकिरण बिऱ्हाडे, फिरोज पठाण, खलील शेख, प्रतिमा सानप मान्यवर उपस्थित होते. तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक राजेंद्र पाटील, शांताराम भंगाळे, सुशील पवार, खंडारे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जळगाव शहरातील सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक व मनपा शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव बागुल यांनी केले. या अभियानासाठी शाळेतील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

Protected Content