जळगावातील आंबेडकर नगरात तरूणावर प्राणघातक हल्ला

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आंबेडकर नगरात भांडण सोडविण्यासाठी गेलल्या तरूणावर हल्लेखोरांनी मानेवर चॉपरने हल्ला केल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली. जखमीस रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अद्याप याप्रकरणी पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील आंबेडकर नगरात मध्यरात्री १२.३० ते १ वाजेच्या सुमारास दोन गटात भांडण सुरू होते. हे पाहून विशाल कैलास सोनवणे (वय-३२) रा. आंबेडकर नगर हा दोघांचे भांडण सोडविण्यासाठी गेला. याचा राग आल्याने गटातील अज्ञातांनी विशालवर चॉपरने हल्ला केला. यात विशालच्या मानेच्या उजव्या बाजूला व उजव्या डोळ्याच्या भुवयांवर मोठी जखम केली. यावेळी मोठाप्रमाणावर रक्तस्त्राव होत असल्याचे पाहून नातेवाईकांनी तातडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान शनीपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी जाबजबाब घेण्यासाठी रवाना झाले असून प्राथमिक तपास पोहेकॉ दिनेशसिंग पाटील करीत आहे.

Protected Content