संतोष बांगर यांच्या ताफ्यावरील हल्ल्याने वातावरण तापले

अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

आमदार संतोष बांगर अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी येथे गेले असताना त्यांच्यावर स्थानिक शिवसैनिकांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी ५० खोके एकदम ओकेच्या घोषणा देत त्यांच्या गाडीला थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहे.

संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. बांगर हे सुरुवातीला शिवसेना गटात होते. मात्र ऐनवेळी ते शिंदे गटात सामील झाले. तसेच त्यांनी मुंबईत शिक्तीप्रदर्शन देखील केले होते. या व्यतिरिक्त ते उद्धव ठाकरे गटावर टीका करताना देखील दिसून आले होते.

यावर आमदार संतोष बांगर यांनी संतप्त प्रतिक्रिया देत शिवसैनिकांना प्रतिआव्हान दिले आहे. तर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा दिला आहे.

Protected Content