धनाजी महाविद्यालयात युवती सभा उद्घाटन सोहळा उत्साहात

फैजपूर प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र  विद्यापीठ विद्यार्थी विकास ,जळगाव आणि धनाजी नाना महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवती सभा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

युवती सभेचे उदघाटन धनाजी नाना चौधरी विद्याप्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगाव येथील प्रा. डॉ.  सुनीता चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे  अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी. आर. चौधरी यांनी भूषविले. याप्रसंगी  प्राचार्य डॉ पी. आर. चौधरी यांनी युवतींचे सबलीकरण म्हणजे युवतींचा सर्वांगीण विकास होय असे सांगितले. तसेच युवतींनी वेगवेगळ्या भूमिका निभावताना त्यादृष्टीने  त्यांनी आपलं जीवन आदर्श, सुखी आणि संस्कारित करण्याचा प्रयत्न करावा असेही सांगितले.

प्रा.डॉ  सुनीता चौधरी यांनी विद्यार्थीनींना व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले. युवतींनी स्वतःमधील विविध कौशल्य  विकसीत करून व्यक्तिमत्वाचा विकास करावा. तसेच सकारात्मक विचार ठेवून कार्य पद्धती ठरवून घ्यावी. संकटामधून संधी शोधण्याचा प्रयत्न करावा. मनाच्या हार्ड डिस्क वरील घाण फॉरमॅट करून चांगल्या जीवन शैलीचा अंगीकार करावा असा मोलाचा सल्लाही त्यांनी युवतींना दिला.  रॉबर्ट जॉन आणि सिंधुताई सपकाळ यांचा जीवन प्रवास सांगून आपले जीवन कसे जगावे  ते युवतींना विविध उदाहरणाद्वारे पटवून दिले.

विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ जी जी कोल्हे यांनीही विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवतीसभा प्रमुख प्रा. डॉ. सविता वाघमारे यांनी केले. याप्रसंगी प्रा डॉ राजश्री नेमाडे, प्रा डॉ कल्पना पाटील, प्रा डॉ  सरला तडवी, प्रा डॉ  जयश्री पाटील, प्रा डॉ सीमा बारी,प्रा डॉ नाहिदा कुरेशी तसेच  महिला प्राध्यापिका आणि  विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कु. सायली चौधरी आणि कु. ज्ञानेश्वरी पाटील यांनी केले.

Protected Content