स्व. हरिभाऊ जावळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त भालोद येथे कार्यक्रम

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार व माजी खासदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे उद्या द्वितीय पुण्यस्मरण असून भालोद येथील सखाराम पतसंस्थेत भाऊंच्या आठवणींना उजाळा व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावयाचे अहवान केले आहे.

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार व माजी खासदार मसाकाचे चेअरमन माजी शेती मातीशी नाळ जुळलेले स्वर्गीय हरिभाऊ जावळे हे दि. 16 जून 2020 ला आपल्याला सोडून निघून गेले. भाऊच्या आठवणी कार्यकर्त्यांना येत नाही असा एकही दिवस कार्यकर्त्यांसाठी उगवत नाही. रोज सातत्याने काही न काही कारणाने निमित्ताने ह्या विकास पुरुषाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. सामान्य कुटुंबातील असामान्य नेता कार्यकर्त्यांच्या मनावर आजही राज करीत आहे.

जिथे जावे ,इकडे तिकडे पाहावे तिथे भाऊ ची आठवण आल्याशिवाय राहात नाही.महाकाय जल पुराण भरण विषयावर कार्यकर्त्यांच्या चर्चा चालू असल्याकी भाऊ ची आठवण आल्याशिवाय राहात नाही. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्नय शेळगाव बॅरेज जवळून जाताना त्या रस्त्याने आपण जातो व पूर्ण झालेल्या शेळगाव बॅरेज आपल्याला दिसतो तेव्हा प्रत्येक माणसाला हरिभाऊ आठवण येते व मन गहीरवरून जाते.

किंबहुना यावल पंचायत समितीची नवीन इमारत कार्यालय तसेच यावल नवीन तहसील कार्यालय मध्ये प्रवेश करताना इमारतीकडे पाहताना भाऊ ची आठवण आल्याशिवाय राहत नाही तसेच माझ्या बागायतदार शेतकऱ्यांना उच्च दाबाने वीज पुरवठा व्हावा याकरिता विरोदा येथे ४४० V सब स्टेशन ,३३/११ KV भालोद,मोह्गन,सातोद ,डोंगर कठोरा असे अनेक विधुत उपकेंद्र उभारून अशी शेतकऱ्यासाठी व्यवस्था केली.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा केळी पीक विम्याचा निकष बदलण्यासाठी हरी भाऊंचे योगदान शेतकरी कधीही विसरू शकत नाही. मतदार संघात पाणी टंचाई व भूभागातील पाणी सातत्याने खोल जात असल्याने  थेंब अमृताचा जलक्रांती  संतमहंत व नागरिकांना सोबत घेऊन लोकवर्गणीतून पाणी आडवा पाणी जिरवा बऱ्याच गावांमध्ये भाऊने कामे केली.

तसेच आमोद्या हून पाल येथे जात असताना आपण ज्या रस्त्याने जातो तो मार्ग पाहिला की हरिभाऊ डोळ्यांसमोर दिसतात. असे अनेक विकासाची कामे करून आपल्या कामाचा ठसा उमरवून विकास पुरुष आपल्याला अर्ध्यात सोडून गेले. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण सर्व कार्यकर्ते व हरिभाऊचे चाहते बंधू-भगिनी यांनी भालोद येथे  १६.जून.२०२२ रोजी गुरवार सकाळी ०९.०० त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण सर्व कार्यकर्ते व हरिभाऊचे चाहते बंधू-भगिनी यांनी भालोद येथे आपल्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण हजर राहावे.

तसेच कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात भाऊच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा व वृक्ष लागवड करावी, त्या ठिकाणी फळ वाटप किंवा आपल्याला योग्य कार्यक्रम वाटतील असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!