गुड शेफर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये गीतगायन स्पर्धा उत्साहात

Singing competition in Good School

 

धरणगाव प्रतिनिधी । येथील गुड शेफर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये गीतगायन व वेशभूषा स्पर्धा नुकतीच संपन्न झाली आहे. शाळेतील नर्सरी ते सिनियर व इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा साकारल्या.

विद्यार्थ्यांनी साकारल्या वेशभूषा
जसे छत्रपती शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, श्रीकृष्ण, सरकार, मावळा, वारकरी, शाळकरी मुलगा, शेतकरी, सैनिक, जलड्रॉप, रॉकेट, भाजीवाली, डॉक्टर, वकील, बातमीदार, मिस युनिव्हर्स, सासूबाई, भारत अशा विविध भूमिका साकारताना या चिमुकल्यांनी व्यक्त केलेल्या भावनांनी उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे परिक्षक
इयत्ता ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थांनी गीतगायनाच्या माध्यमातून आपली छाप पाडली. विद्यार्थ्यांच्या सुमधुर गीतांच्या माध्यमातून प्रेक्षकांना भविष्यातील लता, रफी, मुकेश तसेच सुनिधी, श्रेया, अजय-अतुल अशा गायकांची झलक पाहायला मिळाली. या कार्यक्रमाला जि.प.रोटवदच्या मुख्याध्यापिका माधुरी बाचपाई व संगीतम ऑर्केष्ट्राचे संचालक सचिन भावसार हे परीक्षक म्हणून लाभले.

शिक्षकांनी घेतला सहभाग
कार्यक्रमाच्या सुरवातीला परीक्षकांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. तद्नंतर परीक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सचिन भावसार यांनी आपल्या सुरेल आवाजात एक सुमधुर गीत सादर केले. समोर असलेल्या या स्टेजचा मोह शाळेतील शिक्षकांना देखील आपल्यातील सुप्त कलागुणांना प्रदर्शित करण्याची प्रेरणा देऊन गेला आणि त्याचाच परिणाम म्हणून काही शिक्षक-शिक्षिका यांनी देखील काही गीते सादर केली.

कार्यक्रमासाठी यांनी केले परिश्रम
कार्यक्रमाला प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नाजूका भदाणे व शिरीन खाटीक यांनी केले.

Protected Content