जैन पतसंस्थेतर्फे गुणवंताचा सत्कार

पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । पहूर येथील वेदांत क्लिनीकचे संचालक डॉ. रमेश पाटील यांचे सुपुत्र वेदांत पाटील याने (NEET-2020) परीक्षेत 720 पैकी 589 गुण तर आदित्य पाटील याने 559 गुण आणि पंडित सरांची नात हिने 522 मार्क्स मिळून घवघवीत यश संपादित केले असून जैन पतसंस्थेतर्फे गुणवंताचा सत्कार करण्यात आला.

या यशाबद्दल या सर्वानचे पहूर येथील गजानन दुध उत्पादक तसेच ईश्वर बाबुजी जैन पतसंस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन भास्कर पाटील , माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा ,कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती संजय देशमुख, उपसरपंच श्यामराव सावळे,  माजी उपसरपंच राजू पाटील, ग्रामपंचायत सदस्य शरद पांढरे, आशोक देशमुख, किरण पाटिल, राष्ट्रवादी काँग्रेस युवा तालुकाध्यक्ष शैलश पाटिल, अॅड . संजय पाटील, डॉ . रमेश पाटील, पंडीत सर, किशोर पाटील उपस्थित होते.

 

वेदांत पाटील हा येथील डाॅ. रमेश पाटील यांचा मुलगा आहे. वेदांत पाटील  यांच्या या यशाने गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.  त्याचे सर्व थरातुन अभिनंदन होत आहे.

 

Protected Content