Home Cities जळगाव जगभरातील गोदावरीचे विद्यार्थी एकत्र; अलुम्नी मीट २०२६मध्ये अनुभव, यशोगाथा आणि आठवणींचा अनोखा...

जगभरातील गोदावरीचे विद्यार्थी एकत्र; अलुम्नी मीट २०२६मध्ये अनुभव, यशोगाथा आणि आठवणींचा अनोखा संगम

0
8

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित आणि स्वायत्त दर्जा प्राप्त गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील अलुम्नी असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेला ‘अलुम्नी मीट २०२६’ हा ऑनलाइन स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. देश-विदेशातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे १०० माजी विद्यार्थ्यांनी गुगल मीटच्या माध्यमातून सहभाग नोंदवत महाविद्यालयाशी असलेले भावनिक नाते पुन्हा एकदा दृढ केले. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या यशस्वी वाटचालीच्या आठवणींना उजाळा देत संस्थेच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात डीन (माजी विद्यार्थी आणि आंतरराष्ट्रीय संबंध) प्रा. प्रशांत शिंपी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. विजयकुमार वानखेडे यांनी सध्याच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी करिअर मार्गदर्शन, इंटर्नशिप, रोजगाराच्या संधी, उद्योग-शैक्षणिक सहकार्य आणि प्लेसमेंट प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रेश्मा अत्तरदे यांनी केले. यावेळी ऋषिकेश ठाकूर, रिद्धी कर्णावत, जेमिष लखानी, तुषार जैन, निखिल मंडाले, सागर काळे, राहुल सिंग, रोहित सिंग, हर्षल परदेशी, स्वप्निल ठाकूर, किरण भावसार, दर्शन भट, धीरज, आलोक, नरेंद्र महाजन, उन्मेष पाटील, उबेदुल्ला, रोशनी पाटील, तुषार धांडे, जगदीश अटोळे, रुपेश कुमावत, कपिल पारसे, मयूर कासट, सुरज, अभिजीत पवार, निखिल कोठावदे आणि गणेश राज यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या माजी विद्यार्थ्यांनी विविध बहुराष्ट्रीय कंपन्या, प्रतिष्ठित संस्था तसेच स्वतःच्या उद्योग-व्यवसायातील यशस्वी प्रवासाविषयी अनुभव कथन केले. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी आयोजकांचे कौतुक करत माजी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


Protected Content

Play sound