‘तानाजी’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; कोर्टात याचिका दाखल

Tanaji movie

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । अजय देवगणचा बहुप्रतीक्षित आणि महत्वक्षांशी चित्रपट ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ येऊ घातला आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यानंतर गाणी प्रदर्शित झाल्यावर चित्रपटाची उत्सुकता अजूनच वाढली आहे. मात्र इतर ऐतिहासिक चित्रपटांप्रमाणे हा चित्रपटही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटामध्ये तानाजीचा मूळ वंश वेगळाच दाखवण्यात आला असून, तानाजीची खरी वंशावळ दर्शविण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. असे घडेल नाही, तर चित्रपटाला प्रमाणपत्र न देण्यासाठी कोर्टाने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) ला निर्देश द्यावेत असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे

दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर १९ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी मराठी आणि हिंदीत सर्वत्र प्रदर्शित होणार असून या चित्रपटाविरुद्ध दाखल झालेल्या याचिकेवर कोर्टाकडून कोणता निर्णय दिला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी चित्रपटाच्या नावाबद्दलही वाद झाला आहे. मराठी जाणकारांनी आरोप केला होता की, मेकर्सने खरे नाव ‘तानाजी’ तोडून मोडून ‘तान्हाजी’ असे दाखवले आहे. मात्र यावर डायरेक्टरने स्पष्टीकरण देत सांगितले होते की, “इतिहासाची पाने चालली गेली तर त्यातही त्यांचे नाव ‘तान्हाजी’ असेच लिहिलेले आहे.”

Protected Content