वल्लभदास वालजी वाचनालयाच्या मैदानात खो-खो स्पर्धेचे उद्घाटन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील स्टेशन रोडवरील वल्लभदास वालजी वाचनालयाच्या मैदानात सोमवारी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता महापौर जयश्री महाजन याच्याहस्ते खो-खो स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचनालय, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने स्टेशन रोडवरील वल्लभदास वालजी वाचनालयाच्या मैदानात सोमवारी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते नारळ फोडून करण्यात आले. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांनी खो-खो खेळाचे महत्व सांगितले. त्या म्हणाले की, प्रत्येकाने आपले चांगले आरोग्य टिकविण्यासाठी कोणत्याची खेळाची कास धरावी, खेळामुळे आपले शरीर सुदृढ तर राहतेच शिवाय आपल्या जीवनात नवीन कला शिकायला मिळतात असे सांगितले.

या प्रसंगी महापालिका क्रीडा अधिकारी दिनानाथ भामरे, महाराष्ट्र खो-खो असोशिएशनचे सहसचिव जयांशू पोळे, जळगाव जिल्हा खो-खो असोशिएशनचे सचिव राहूल पोळे, महाराष्ट्र खो-खो असोशिएशनचे तांत्रिक समिती सदस्य अनंता सैदाणे, राष्ट्रीय खो-खो पंच दिलीप चौधरी, क्रीडा शिक्षक उल्हास ठाकरे, अनंत पाटील, किशोर जाधव, मुकुंद शिरसाठ, रविंद्र पाटील, रमेश ससाणे, श्र्वेता कोळी यांच्या सह खेळाडू उपस्थित होते.

Protected Content