जिल्ह्यातील ५१ गुन्हेगार हद्दपार; पोलीस अधिक्षकांचा दणका

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात ‘अनलॉक’चा  टप्पा सुरू होत असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी दहशत माजविणाऱ्या रेकॉडवरील ५१ संशयित गुन्हेगारांना जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी हद्दपार केले आहे. 

जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत अट्टल गुन्हेगार आणि संशयित गुन्हेगारांची यादी मागविण्यात आली. यात १ वर्ष व २ वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या बाहेर ज्याठिकाणी राहत असेल त्याठिकाणीच्या परिसरातील पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक आहे. 

पोलिस ठाणेनिहाय हद्दपार गुन्हेगार

जळगाव शहर : शोएब शेख युसूफ (शाहूनगर), तेजीम बेग नजीम बेग मिर्झा ऊर्फ सुल्तान मिर्झा (रा. तांबापुरा), गुड्डू ऊर्फ नईम रहेमान भिस्ती (पिंप्राळा, हुडको, जळगाव), मोहसीन खान नूरखान पठाण, अजीज रशीद पठाण, शेख सद्दाम शेख करीम (सर्व रा. गेंदालाल मिल).

 

शनिपेठ : आकाश ऊर्फ धडकन सुरेश सपकाळे, सागर ऊर्फ झंपऱ्या आनंद सपकाळे, विशाल लालचंद बुनकरे ऊर्फ हळंदे, सागर सुरेश सपकाळे, विशाल कैलास सैंदाणे (सर्व रा. कोळीपेठ), गौरव भरत कुंवर (कासमवाडी).

 

रामानंद पोलिस ठाणे : मनोज रमेश भालेराव, हितेश नाना बाविस्कर, किरण अशोक सपकाळे (सर्व रा. पिंप्राळा, हुडको), गोविंदा पीतांबर भोई, इरफान ऊर्फ इप्पो सुसूफ पठाण, सागर हरचंद भोई (सर्व रा. जळगाव).

 

जळगाव तालुका : प्रवीण गोकुळ सपकाळे (रा. खेडी), संतोष राजाराम पाटील (रा. चोपडा), विवेक मधुसूधन सपकाळे (रा. कांचननगर), सोमा सुकलाल मोरे (रा. खेडी), दीपक सुधाकर पाटील (रा. खोटेनगर), कैलास गौतम सपकाळे (रा. खेडी), अविनाश सोपान सपकाळे (रा. पोलन पेठ), नामदेव दिनकर कोळी (रा. असोदा), प्रदीप दगडू सोनवणे (रा. असोदा).

 

एमआयडीसी : पवन ऊर्फ घातक मुकुंदा सोनवणे, सनी ऊर्फ फौजी बाळकृष्ण जाधव (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव), मोनूसिंग जगदीशसिंग बावरी, गुरजितसिंग सुरजितसिंग बावरी (रा. तांबापुरा), राहुल रामचंद्र बऱ्हाटे (रामेश्वर कॉलनी), गोलू ऊर्फ दत्तू नारायण चौधरी (तुकारामवाडी).

 

भुसावळ शहर/बाजारपेठ : भारत मधुकर महाजन, शाकीर ऊर्फ गोलू शेख रशीद, विनोद लक्ष्मण चावरिया, हेमंत जगदीश पैठणकर, चेतन ऊर्फ गोल्या पोपट खडसे, प्रशांत ऊर्फ मुन्ना संजय चौधरी.

 

यावल पोलिस ठाणे : विजय बंडू गजरे (रा. पंचशीलनगर, यावल).

 

मुक्ताईनगर : संतोष अलीस आकाश विष्णू रावलकर (रा. कुऱ्हा), संतोष गंभीर कासोदे (रा. मुक्ताईनगर).

 

वरणगाव पोलिस ठाणे : संतोष रघुनाथ चौधरी (हतनूर).

 

बोदवड पोलिस ठाणे : सागर जगदीश तोरे (रा. भिलवाडी).

 

एरंडोल पोलिस ठाणे : इप्पू ऊर्फ इम्रान मुन्सफखान (कासोदा).

 

चाळीसगाव शहर : शेख जुबेर ऊर्फ साबीर ऊर्फ बेब्बय्या शेख गालीब, विकार ऊर्फ अलाउद्दीन शेख नुरोद्दीन, शोएब ऊर्फ शरीफ ऊर्फ शप्या खान आसीफ खान, अफसर शेख आसीफ शेख, शोएब ऊर्फ उब्बर शेख कादर शेख (रा. चाळीसगाव) अशा ५१ अट्टल गुन्हेगारांना जिल्ह्या‍तून तडीपार करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.

Protected Content