इच्छादेवी चौकात भरदार ट्रकची कारला जोरदार धडक

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याची घटना शुक्रवार रोजी दुपारी २ वाजता घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, “विनय ओमप्रकाश चांडक (वय-४२) रा. दूरदर्शन टॉवर जवळ, जळगाव हे एका कंपनीत सेक्रेटरी म्हणून नोकरीला आहे. शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता ते त्यांची कार (एमएच १९ बीयु ३९४९) ने कामानिमित्त भुसावळकडे कारने जात होते. त्यावेळी त्यांच्या कारच्या मागे (एमएच ४० बीजी ६२८७) क्रमांकाची ट्रक येत होता.

इच्छादेवी चौफुलीकडून जात असताना भरधाव वेगाने मागून ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत विनय चांडक हे किरकोळ जखमी झाले व त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले. या संदर्भात विनय चांडक यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” पुढील तपास सुनील सोनार करीत आहे.

Protected Content