जिल्हा रूग्णालयातून कर्मचाऱ्याची दुचाकी लंपास

download 4

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा शासकिय रूग्णालयात कार्यरत असलेल्या कर्मचार्‍याची नवी मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

मिळालेली माहिती अशी की, बापू राजाराम नेरे हे जिल्हा शासकीय रूग्णालयात कार्यरत आहेत. ते रूग्णवाहिकेवर चालक आहेत. रविवार 19 रोजी सकाळी नेहमी प्रमाणे सकाळी 10 वाजता त्यांच्या मालकीची दुचाकी (एम.एच. 19 बी.डी. 8166) या दुचाकीने रूग्णालयात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या कार्यालयासमोर आवारात त्यांनी ही दुचाकी पार्किंग केली. नंतर त्यांना विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या रूग्णवाहिका ड्युटीला ते निघून गेले. दुपारी दोन वाजेच्या सुमारास नेरे हे रूग्णालयात आले असता त्यांनी लॉक केलेली दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी परिसरात शोध घेतला असता तपास लागला नाही. या प्रकरणी त्यांनी पोलिसात ऑनलाईन तक्रार केली होती त्यानुसार आज जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान जिल्हा रुग्णालयात यापूर्वीही अनेकदा दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत.

Add Comment

Protected Content