वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

यावल-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात वाळु माफियाची मुजोरी वाढली असतांना यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या उपस्थित महसुलच्या पथकाने शहरातुन अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडण्यात आले आहे. महसुल प्रशासनाने रात्रीच्या वेळी अवैद्यरित्या होणारी डंपरव्दारे होणारी वाळु वाहतुकीवर देखील कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

 

या संदर्भात महसुलच्या सुत्रांकडुन मिळालेल्या माहिती अनुसार दिनांक २ जुलै रविवार रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास यावल शहरातील अंकलेश्वर राज्य महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ अवैधरित्या ट्रॅक्टर मधून अर्धा ब्रास वाळुगौण खनिज ची वाहतुक करीत असतांना ट्रॅक्टरचे चालक व मालक शेख अख्तर शेख करीम रा.यावल यांच्याकडून जप्त करण्यात आले आहे .

 

फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांच्या सुचनेनुसार यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल शहरचे तलाठी ईश्वर कोळी , अजाळे गावाचे तलाठी शरद सुर्यवंशी, बामणोदचे कोतवाल पाडळसा गावाचे कोतवाल यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान रात्रीच्या वेळी यावल चोपडा मार्गावर मोठया प्रमाणावर सुसाट वेगाने धावणाऱ्या डंपर व्दारे अवैद्यरित्या वाळुची वाहतुक केली जात असुन,तहसीलदार व त्यांच्या महसुलच्या पथकाने या डंपर देखील कारवाई करावी अशी मागणी होत आहे .

Protected Content