यावल येथे साने गुरुजी महाविद्यालयात शिष्यवृत्ती परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल येथे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिक्षकांना मार्गदर्शन व्हावे यासाठी दोन दिवसीय कार्यशाळा गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती यावल विश्वनाथ धनके यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली . या शिष्यवृत्तीच्या परिक्षा संदर्भात आयोजीत कार्यशाळेत इत्तया.५ वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भात मार्गदर्शन कार्यशाळेत यावल तालुका इ.५ वी व  इ.८वी च्या वर्गांना शिकवणारे तालुक्यातील शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.

या मध्ये परीक्षेचे स्वरूप ,प्रश्नपत्रिकांचे स्वरूप, शिष्यवृत्ती मधील फॉर्म भरण्या संबंधी ची माहिती, तसेच इंग्रजी अभ्यास कसा सोपा होईल, विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका कशा सोडवाव्या ,प्रश्नपत्रिका च्या स्वरूपा मध्ये नवीन झालेला बदल २० टक्के प्रश्न ज्यांच्यामध्ये दोन पर्याय निवडायचे आहे.

या संबंधी व कार्यशाळेत उपस्थित शिक्षकांकडून कार्यशाळेस शाळेत चांगला प्रतिसाद मिळाला . यावल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी दोन्ही दिवस उपस्थित राहून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम कसा सोपा जाईल या बाबत गणितीय तसेच इंग्रजी विषय विद्यार्थ्यांना सोपा कसा जाईल विषयी मार्गदर्शन केले .

इंग्रजी विषयासाठी दीपक बारी , सत्कार विद्यामंदिर अट्रावल, भाषा विषयासाठी  निर्मल चतुर,पी. एस. एम.एस.स्कूल बामणोद, गणित विषयासाठी अर्शद पठाण इंदिरा गांधी हायस्कूल यावल यांनी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणासाठी साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एम. के. पाटील सर यावल तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी श्री विश्वनाथ धनके यावल तालुक्याचे केंद्रप्रमुख  शाकीर सर ,बी.आर.सी कार्यालयातून वरवटकर सर यांची उपस्थिती होती. तसेच तालुक्यातील दोन्ही दिवस शिक्षकांनी चांगला सहभाग नोंदविला.

Protected Content