मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जळगावात मोटारसायकल रॅली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मराठा समाजाला ओबीसी मध्ये गणले गेले पहिजे, त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, जातनिहाय जनगणना करत ओबीसींचे आरक्षण वाढवावं आणि त्यासाठी आधी मराठा बांधवांना ओबीसीमध्ये घ्याव अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांची सभा रविवारी २ डिसेंबर रोजी शहरातील मानराज पार्क येथील मोकळ्या मैदानात होत आहे. त्यांच्या सभेला पाठींबादेण्यासाठी आणि त्यांच्या समर्थनार्थ आज शनिवारी सकल मराठा समाजाच्या वतीने मोटारसायंकल रॅली काढण्यात आली त्यावेळी लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे या बोलत होत्या.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची सभा रविवारी जळगावात होत आहे. या अनुषंगाने सभेच्या पूर्वसंध्येला शनिवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने काव्यरत्नावली चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळापर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली.

जळगाव शहरातील मानराज पार्क येथे रविवारी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मराठा आरक्षण मिळावे, यासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची सभा होत आहे. त्यांच्या सभेला आणि त्यांच्या मागणीला पाठिंबा देत जळगाव शहरातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने शनिवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मोटरसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी “एक मराठा लाख मराठा” च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. ही मोटारसायकल रॅली शहरातील काव्यरत्नावली चौक येथून सुरुवात होऊन एम.जे. कॉलेज गुजरात पेट्रोल पंप, पिंप्राळ परिसर, बजरंग बोगदा, गणेश कॉलनी, कोर्ट चौक, टॉवर चौकमार्गे काढून अखेर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोटारसायकल रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी जळगाव जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पहायला मिळाले.

Protected Content