राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या कारला अपघात

sharmila thackeray accident

नवी मुंबई प्रतिनिधी । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या कारला अपघात झाला. राज ठाकरे आपल्या परिवारासह आज एकवीरा देवीच्या दर्शनाला गेले होते. दर्शन करून मुंबईत परतत असताना हा अपघात झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, नवी मुंबईतील सानपाड्याच्या सिग्नलजवळ एक ऑटो रिक्षा अचानक शर्मिला यांच्या कारच्या समोर आली. तिला धडक बसू नये म्हणून ड्रायव्हरना कारचा ब्रेक लावला. त्याचवेळी मागून आलेल्या गाडीनं शर्मिला यांच्या कारला धडक दिली. या अपघातात शर्मिला ठाकरे यांना मुका मार लागला आहे. तर चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. राज ठाकरे यांची कार त्यावेळी पुढे निघून गेली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर, शर्मिला यांच्यासह इतर सर्वजण दुसऱ्या गाडीने लगेचच मुंबईच्या दिशेने रवाना झाले. राज ठाकरे यांचा पक्ष नव्या जोमाने विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. येत्या ९ तारखेपासून राज हे महाराष्ट्रभर प्रचाराला सुरुवात करणार आहेत. प्रचाराला सुरुवात करण्याआधी ठाकरे घराण्याची कुलदैवत एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी आज ते सहकुटुंब देवदर्शनाला गेले होते. तिथून परतत असताना ही घटना घडली.

Protected Content