किनगाव खुर्द येथे दलित वस्ती सुधार निधीचा दुरुपयोग ; पीआरपीने केली चौकशीची मागणी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव खुर्द ग्रामपंचायतीकडून दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत मंजूर निधीतून इतर कामे करण्यात येत असल्याची तक्रार करून तत्काळ या कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पीआरपीने पंचायत समितीकडे केली आहे.

 

यावल पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांच्याकडे पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे यावल तालुकाध्यक्ष राहुल बापू साळुंके  व जिल्हा प्रतिनिधी रतन रमेश साळुंके यांनी दिलेल्या निवेदनाच्या लिखित तक्रारीनुसार म्हटले आहे की, किनगाव खुर्द ता. यावल ग्रामपंचायतीकडे सुमारे २० लाखांचा निधी हा दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत प्राप्त झाला आहे.  या निधीतुन दलीत वस्तीत विविध विकास कामे होणे आवश्यक होते. मात्र सदरची कामे ही फक्त कागदावरच असून प्रत्येक्षात मात्र हा निधी दुसऱ्याच जुन्या कामावर डागडूगीच्या नावाखाली खर्च करण्याचे काम ग्रामपंचायतच्या वतीने सुरु आहे . ग्रामपंचायतच्या भोंगळ व मनमानी कारभारामुळे दलीत समाजाच्या वस्ती विकासासाठी राखीव असलेला निधीचा दुरुपयोग करून इतर ठिकाणी डागडुगीच्या नावाखाली कामे सुरू आहे या कामांची त्वरित चौकशी होऊन तात्काळ सदर काम  थांबविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. आठवड्याभरात चौकशी न केल्यास पंचायत समितीवर मोर्चा आणून जन आंदोलन करण्याचा इशारा पिपल्स रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाच्या यावल तालुका शाखाच्या वतीने निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.

Protected Content