चाळीसगावच्या कॅप्टन कॉर्नर परिसरात घाणीचे साम्राज्य

चाळीसगाव, प्रतिनिधी । शहरातील कॅप्टन कॉर्नर जवळील सौ. शैलजा मेमोरियल दवाखान्यासमोर पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याने त्रस्त झालेल्या नागरिकांकडून नगरपालिकेने  साफसफाई करण्याची मागणी होत आहे.

चाळीसगाव शहरातील कॅप्टन कॉर्नर वरील सौ. शैलजा मेमोरियल कृष्णा क्रिटीकल केअर सेंटर व दवाखान्या समोरील भिंतीजवळ मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. हि गंभीर स्वरूपाची बाब वेळोवेळी नगरपालिकेच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. मात्र, अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची साफसफाई होत  नसल्याने परिसरातील नागरिक  रोष व्यक्त करत आहे. पावसाळ्याचे दिवस जवळ आल्याने या पसरलेल्या घाणीमुळे रोगराई पसरू शकते अशी भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.  मुख्याधिकारी नितीन कापडणीस यांनी तातडीने  या गंभीर समस्याचे निराकरण करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

 

Protected Content