रुग्णांना लुबाडणाऱ्या ८ खाजगी रुग्णालयांचे परवाने रद्द करा — जलील पटेल

 

 

यावल  :  प्रतिनिधी । कोरोना संकटात उपचारांच्या नावाखाली रुग्णांना लुबाडणाऱ्या जिल्ह्यातील जळगाव आणि पाचोरा येथील ८ रुग्णालयांचे परवाने रद्द करा अशी मागणी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे  काँग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील पटेल यांनी केली आहे

 

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाने थैमान घातले असुन , सर्वसामान्यांच्या उपचाराच्या नांवाखाली काही खाजगी रुग्णालयात रुग्णांची मोठी आर्थीक लुट करण्यात येत  आहे  राज्य शासनाने या सर्व खाजगी रुग्णालयांची तात्काळ चौकशी केल्यास मोठा  गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता  आहे  जळगाव शल्यचिकित्सक यांनी कारवाईची भूमिका  घेतलेल्या ८ रुग्णालयांनी  केलेले  कारस्थान खूप वाईट  आहे  सामान्य नागरीकांच्या दृष्टीने प्रश्न निर्माण झाले  आहेत  कोरोना   रुग्णांना  गैरवाजवी   बिल आकारून शासनाच्या आरोग्य नियमांचे  उल्लंघन  झाले आहे , असे  जलील पटेल यांनी सांगितले

 

याबाबत या सर्व रुग्णालयांचे परवाने रद्द करण्यात यावे अशी मागणी ग्रामीण काँग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील पटेल यांनी केली आहे . या संदर्भात आपण  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना  पटोले यांना पत्र पाठवुन या बेजबाबदार डॉक्टर आणि   हॉस्पिटलचे परवाने रद्द करून या ८ रुग्णलयात किती  लोकांना विनाकारणं पैसे भरायला लावून त्यांची   फसवणुक  केली गेली याचा लेखाजोखा मांडून  त्याना कठोर शिक्षा व्हावी अशीही मागणी  करणार असल्याचे  जलिल पटेल यांनी कळविले आहे  जिल्हा शल्य चिकिसक डॉ.एन एस चव्हाण यांना भेटून  चर्चा करणार असल्याचे  त्यांनी सांगीतले

Protected Content