दादावाडी परिसरातून गायची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दादावाडी येथील वृंदावन पार्क येथून एकाची १० हजार रूपये किंमतीची गायीची चोरी झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रविवारी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुका पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, सुरेश पुंडलिक पाटील (वय-४८) रा. वृदांवन पार्क, दादावाडी जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दुध विक्री व शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. २३ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता त्यांनी त्यांच्या मालकीची १० किंमतीची जर्सी गाय घरासमोर बांधलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गायीला चोरून नेल्याचे २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ४ वाजता समोर आले. त्यांनी गायीचा सर्वत्र शोध घेतला परंतू गाय कुठेही‍ मिळून आली नाही. अखेर रविवारी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुशिल पाटील करीत आहे.

Protected Content