भरधाव वेगाने जाणारा टँकर पलटी; चालक जखमी

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील फुलगाव गावाजवळ ट्रँकर पलटी झाल्याने चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी टँकर चालकावर वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील फुलगाव गावाजवळून महामार्गावरून टँकर (जीजे १२ बीझेड ८७००) जात असतांना चालक पिराराम बाबुलाल बिष्णोई (वय-३०) रा. चोटा, राजस्थान याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष झाल्याने टँकर पलटी होवून अपघात झाला आहे. या चालक पिराराम बिष्णोई हा जखमी झाला आहे. या अपघातात टँकरमधील केमीकलचे पुर्णपणे नुकसान झाले आहे. याप्रकरणी वरणगाव पेालीस ठाण्यात चालक बिष्णोई याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मधुकर भालशंकर करीत आहे.

Protected Content