भरधाव कंटेनरची एसटीला धडक

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कुंड गावातील बसस्थानकासमोर भरधाव कंटेनरने बसला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड गावातील बसस्थानकाजवळ बस क्रमांक (एमएच १४ बीटी २२४७) उभी असतांना मागून भरधाव वेगाने येणारे कंटेनरने जोरदार धडक दिल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता घडली. या अपघातात बसचे नुकसान झाले असून सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. याप्रकरणी बसचालक यांनी मुक्ताईनगरपोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून कंटेनरचालक मोहब्बत आमीन खान (वय-२५) रा. लोहसर ता. कामा जि. भरतपुर राजस्थान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पाटील करीत आहे.

Protected Content