संविधानाची तंतोतंत अंमलबजावणी केल्यास देशात महासत्ता येईल !- अनेामदर्शी तायडे

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एक दिवस जर संविधानाची तंतोतंत अंमलबजावणी केली तर भारत समृद्ध देश आणि जागतिक महासत्ता बनू शकतो! असे प्रतिपादन अनोमदर्शी तायडे यांनी केले. सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूल व सर्चलाईट बुद्धिस्ट इंटरनॅशनल प्री प्रायमरी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आपले संविधान आपला आत्मसन्मान या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत अध्यक्ष पदावरून बोलतांना केले.

पुढे बोलताना अनोमदर्शी तायडे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर च्या विचाराची व्यापकता, दूरदृष्टीतून, कल्पकता, कल्याणकारी भारतात लोकराज्य निर्माण करणारी लोकशाही, प्रजासत्ताक शासन प्रणाली करिता जगातील सर्वात महान पावित्र ग्रंथ म्हणजे भारताचे संविधान होय. भारतातले संविधान समता, बंधुत्व, स्वतंत्र, न्याय तत्त्वज्ञान तथागतांच्या कालाम सुत, तेवीज्य सूत, यातून संविधान अंतर्भाव झाले आहे. त्यामध्ये २९ राज्य, १० धर्म, ७५०० जाती, ३००० भाषा, हजारो संस्कृती, १३६ कोटी जनता यांना ७१ वर्षेपासून एकात्मिक, बध करून ठेवली आहे. भारत देशाच्या जडणघडणीत, विविध क्षेत्रात एवढंच नव्हे तर इतिहासातून जर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव काढले तर या देशाचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. आज भारताचे जागतिक स्तरावर जे नाव कोरले गेलेले आहे ते फक्त आणि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आणि हेच अंतिम सत्य आहे हे आपल्या सर्वांना समजून घेणे गरजेचे आहे. नंतर त्यांनी सर्वांच्या साक्षीने भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.

तायडे सरांच्या पुर्वी सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक नितीन झाल्टे सर यांचे मनोगत आणि व्याख्यात्याचे व्याख्यान झाले. भारतीय सविधांनामधून इथल्या शोषित वंचित समूहातील लोकांना सामाजिक आर्थिक राजकीय न्याय मिळवून देण्याची व संधीची समानता देण्याची ग्वाही संविधान देते .लोकांना स्वातंत्र्य , समता, न्याय, बंधुता या उदात्त मूल्यांची देणगी आपणास बुद्ध तत्वज्ञानामध्ये पाहावयास मिळते , बुद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव राज्यघटनेवर्ती पडलेला दिसून येतो. मानवी विकासाचा जाहीरनामा म्हणजे आपल्या संविधानाचे प्रास्तविक होय, आज आपला देश एकसंध असण्याचे एकमेव कारण म्हणजे भारतीय संविधान होय. असे प्रतिपादन सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक ॲड योगेश तायडे यांनी केले.

सुरुवातीला शाळेच्या माध्यमातून संविधान रॅली काढण्यात आली. अत्यंत शिस्त पद्य पद्धतीने ही रॅली वढोदे प्र सावदा या गावातून काढण्यात आली व संविधानाबाबत सामान्य लोकांना माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. उत्साही कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह निर्माण करण्यासाठी शाळेच्या चेअरमन अश्विनी तायडे मॅडम , तेजस्विनी तायडे मॅडम, रंजना बोदडे मॅडम, कविता बैसाणे मॅडम, दिपाली लहासे मॅडम, विक्रम तायडे, प्रदीप तायडे यांनी सहकार्य केले. आयु. ॲड. राजकुमार लोखंडे, ॲड. आनंद वाघोदे, श्रीहरी कांबळे, हर्षल मेढे यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. तिसरण पञ्चसिलानि पंकज बोदडे सरांनी दिले. आभार तेजस्विनी तायडे मॅडम यांनी मानले, सुत्रसंचलन पंकज बोदडे आणि धम्म पालन गाथा अश्विनी तायडे मॅडम यांनी म्हटल्या. या पद्धतीने संपन्न झालेल्या महत्वपूर्ण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Protected Content