लॉकडाऊन नाहीच, पण निर्बंध वाढविणार : आरोग्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई प्रतिनिधी | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली तरी लॉकडाऊन लावण्यात येणार नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केले आहे.

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याचे लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विजय वडेट्टीवार यांनी सुध्दा याचे संकेत दिले होते. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत सावध विधान केले आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने निर्बंध आणखी वाढवू पण लॉकडाऊन होणार नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. वेळ पडल्यास कठोर निर्बंध घालू, असे त्यांनी म्हटले आहे.

राजेश टोपे म्हणाले की, लॉकडाऊनची भिती माध्यमांनी घालू नये. रुग्णसंख्या वाढत असल्याने जरुर निर्बंध वाढवले पाहिजेत. मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, रायगडमध्ये पॉझिटिव्हिटी रेट अधिक आहे. त्यासाठी निर्बंधाची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. पण लॉकडाऊन होणार नाही असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ऑक्सिजनची ७०० मेट्रिक टनांहून अधिक गरज लागल्यास राज्यात टो लाकडाऊन लागू होईल. सध्या लॉकडाऊनचा विचार नाही. राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याबाबत कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Protected Content