चीन येथील जागतिक ब्रिज स्पर्धेत भारताचे पहिले पदक

 

मुंबई प्रतिनिधी । वुहान, चीन येथे झालेल्या जागतिक ब्रिज अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी सीनियर गटात ब्राँझपदकाची कमाई केली. प्रथमच भारताने या स्पर्धेत पदकाची कमाई केली आहे.

या सीनियर गटात श्रीधरन, सुकमल दास, जितेंद्र सोलानी, दीपक पोद्दार, सुब्रत साहा आणि सुभाष धाक्रस यांचा समावेश होता. ही ४४वी ब्रिज अजिंक्यपद स्पर्धा होती. दोन वर्षांपूर्वी भारताने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. यावेळी भारतीय संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला होता, पण ब्राँझपदकाच्या झुंजीत नेदरलँड्सला हरवून त्यांनी हे पदक जिंकले. यावेळी खुला गट, महिला गट, मिश्र गट आणि सीनियर गट अशा चार गटात भारतीय खेळाडू खेळले. या चारही गटासाठी भारत सरकार, क्रीडा प्राधिकरणाने भारतीय खेळाडूंचा संपूर्ण खर्च केला.

Protected Content