चाळीसगाव तालुक्याच्या विकासाला अजून गतिमान करण्यासाठी कटिबद्ध – मंगेश चव्हाण

mangesh patil news

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्याला सर्वात जास्त निधी गेल्या पाच वर्षात आला. सर्व क्षेत्रात चाळीसगावचा विकास होत आहे. या विकासाला अजून गतिमान करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे प्रतिप्रादन उमेदवार मंगेश चव्हाण यांनी केले. मेहुनबारे येथे आयोजित मेहुणबारे – दहिवद गटाच्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा असेल तसेच चाळीसगाव तालुक्याचा विकास रथ जोरदारपणे पुढे न्यायचा असेल तर स्वतःलाच उमेदवार समजून कामाला लागा. भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार माझे मित्र मंगेश चव्हाण यांना प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहन खासदार उन्मेष पाटील यांनी केले. जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर हे सरकार भक्कमपणे स्थिर राहून अनेक शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून त्या यशस्वीरित्या राबविल्या. सरकार ने अनेक योजना राबवून शेतकरी मजूर व विविध क्षेत्रातील लोकांना त्यांचा हक्क मिळवून दिले असे सांगितले.

यांची होती उपस्थिती
भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संजीवआबा पाटील, तालुकाध्यक्ष के.बी. साळुंखे, जि.प.सभापती पोपट तात्या भोळे, पं.स.सभापती दिनेश बोरसे, उपसभापती संजय पाटील, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, जि.प.सदस्य मोहिणीताई गायकवाड, मार्केट कमिटी सभापती रविंद्र पाटील, मार्केट कमिटी संचालक सरदार राजपूत, किशोर पाटील, विश्वजीत पाटील, माजी जि.प. सदस्य शेषराव पाटील, किशोर पाटील ढोमनेकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य धर्मा वाघ, जिल्हा बँक संचालक राजू राठोड, किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस कैलास सूर्यवंशी, पं.स.सदस्य पियूष साळुंखे, न.पा.गटनेते संजय पाटील, सरचिटणीस प्रा. सुनील निकम, माजी तालुकाध्यक्ष अध्यक्ष सुरेश सोनवणे, भाऊसाहेब जगताप, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष कपिल पाटील, गटप्रमुख भैयादादा वाघ, गणप्रमुख सुनिल पवार, भोला पाटील, नगरसेवक चीरागुद्दीन शेख, चंद्रकांत तायडे, बापू अहिरे, भास्कर पाटील, प्रभाकर चौधरी, सोमसिंग राजपूत, संजय बोरसे, संजय पाटील, ऋषिकेश अमृतकार, प्रदीप देवरे, अयास पठाण, राजू शेख व सर्व आजी माजी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य सरपंच उपसरपंच आदी मान्यवर उपसथित होते.

पोपटतात्या भोळे, धर्मा वाघ, संजय पाटील, दिनेश बोरसे, भाजपा तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे यांनी आपल्या मनोगतात खा.उन्मेष पाटील यांनी केलेल्या कामावर प्रकाश झोत टाकत मंगेश चव्हाण देखील त्यांचेच मित्र आहे आणि तेही त्याचप्रमाणे तालुक्याचा विकासरथ ओढतील, अशी आशा व्यक्ती केली. पियुष साळुंखे यांनी प्रास्ताविक केले.

Protected Content