…तर पवारांची औलाद सांगणार नाही : अजित पवार

aajit pawar

 

सोलापूर (वृत्तसंस्था) आमच्या हाती सत्ता दिल्यास तीन महिन्यात सात बारा कोरा नाही केला तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिले आहे. ते आज माळशिरस येथील प्रचार सभेत बोलत होते.

 

विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीने भाजपातून आलेले उत्तम जानकर यांना माळशिरस (राखीव) मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज माळशिरस येथील वेळापूरमधून प्रचाराला सुरुवात केली. अजित पवार यांनी या मतदारसंघाचे महत्त्व ओळखत तब्बल सव्वा तास तुफान टोलेबाजी करीत फडणवीस सरकारला धारेवर धरले. तसेच आमच्या हाती सत्ता दिल्यास तीन महिन्यात सात बारा कोरा नाही केला तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे आश्वासनही दिले. यावेळी पवार यांनी फडणवीस सरकारच्या कर्जमाफीबाबत अतिशय तिरकस शब्दात टीका केली.

Protected Content