लैंगिक अत्याचारप्रकरणी एकावर गुन्हा

रावेर प्रतिनिधी । आभोडा येथील १९ वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रमजीपुर येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत वृत्त असे की आभोडा येथील १९ वर्षीय महिलेवर दि २ जून रोजी सिंदखेडा शेती शिवारमध्ये भास्कर कावडकर याने पीडीत महिलेवर लैंगिक अत्याचार केला तर अमोल धनगर महेश महाजन आनंदा कावडकर ललित महाजन नितिन पाटील सर्व राहणार रजीपुर यांनी पीडीत महिलेच्या काका गावसिंग बारेला यांना मारहाण करून मोटरसायकलची तोडफोड केली म्हणून यांच्या रावेर पोलिसात अॅट्रोसिटीसह इतर कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी भेट दिली असून तपास स्वता करीत आहे.

परस्पर विरोधी गुन्हे दाखल 

दरम्यान याच गुन्हात परस्पर विरोधी गुन्हे दाखल केला असून यात रमजीपुर येथील भास्कर कावडकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. नकाराम बारेला यास पैसे उसनवार दिल्याने याचा राग आल्याने नकाराम बारेला शांताराम बारेला  दालसिंग बारेला परमसिंग बारेला  या चौघांनी फिर्यादीस लाठ्या-काठ्याने मारहाण करून दुखापत केली म्हणुन रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हाचा तपास पो हे कॉ सतीष सानप करीत आहेत.

 

Protected Content