नोंदणीकृत घरेलू कामगारांना मिळणार १५०० रूपये आर्थिक मदत

 बुलढाणा, प्रतिनिधी ।   राज्यात कोविड -१९  संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णाची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी गेल्या एप्रिल पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्यामुळे रोजगार बंद पडले आहे. या पार्श्वभुमीवर घरकाम करणाऱ्या नोंदणीकृत घरेलू कामगारांना राज्य शासनामार्फत प्रत्येकी १५००  रुपये मदतीचा आधार मिळणार आहे.  ही रक्कम  थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याणकारी मंडळातर्गत २०११  ते ३१  मार्च २०२१  या कालावधीत नोंदणी केलेल्या घरेलू कामगारांना प्रत्येकी १५००  रुपये प्रमाणे अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सदर योजनेचा लाभ मिळण्याकरिता आवश्यक सर्व कागदपत्र, मोबाईल क्र. स्वयंसांक्षकित करुन कार्यालयाच्या  gharelu [email protected] या ईमेल आयडीवर अर्ज सादर करावा. जेणेकरुन कुठलाही नोंदीत घरेलू कामगार लाभापासून वंचित राहणार नाही, याची नोंद घ्यावी. नोंदणीकृत घरेलू कामगारांचे आवश्यक कागदपत्रे बँकेचे पासबुक, नोंदणीकृत नुतणीकरणाची पावती, आधारकार्ड, राशनकार्ड इत्यादी कागदपत्र आवश्यक आहे, तरी नोंदणीकृत घरेलू कामगारांनी नोंदणी करावी, असे आवाहन  सरकारी कामगार अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

Protected Content