मेहरूणमध्ये नायलॉनचा मांजा विक्री करणारा तरूणावर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूण परिसरातील तुळजामाता नगरात विनापरवाना नायलॉनच्या मांजाची विक्री करणाऱ्या एका तरुणावर एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी १४ जानेवारी रोजी दुपारी कारवाई केली आहे. त्याच्याकडून १ हजार ७०० रूपये किंमतीचा नॉयलॉनचा मांजा हस्तगत केला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मेहरुण परिसरातील तुळजामाता नगरात मुकेश अशोक वडनेरे (वय-२७) रा. तुळजामाता नगर, मेहरूण हा तरुण शासनाने निर्बंध घातलेल्या बेकायदेशीररित्या नायलॉनचा मांजा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक इमरान अली सय्यद, सचिन पाटील, पोलीस नाईक योगेश बारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, साईनाथ मुंढे यांनी शुक्रवारी १४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता छापा टाकून संशयित आरोपी मुकेश अशोक वडनेरे याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून १ हजार ७०० रुपये किमतीच्या नॉयलॉनचा मांजा हस्तगत केला आहे. या प्रकरणी साईनाथ मुंढे यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी १४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content