कोरोना निर्बंधांचे उल्लंघन : राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांना अटक

पुणे प्रतिनिधी । उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केल्या प्रकरणी या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पाच जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी पुण्यातील राष्ट्रवादी भवनाचे उद्घाटन करण्यात आले. पुणे शहरामध्ये वीकेंड लॉकडाऊन तसेच कोरोनामुळे निर्बंध घातलेले असताना या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली होती. नंतर रविवारी शिवाजीनगर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. कोरोना नियमांचा भंग केल्याबद्दल शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याच प्रकरणात आता पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख यांच्यासह एकूण सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

Protected Content