पुलाअभावी आणखी एकाचा बळी

shivaji nagar

shivaji nagar

जळगाव प्रतिनिधी । गेल्या रविवारी 17 रोजी महिलेची तब्बेत बिघडल्याने रेल्वे गेट बंद असल्यामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतांना आज त्याच परिस्थितील शिवाजी नगरात एका व्यक्ती हृदयविकाराच झटका आल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात नेत असतांना रेल्वे गेट बंद असल्याने त्यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याची घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, शहरातील शिवाजी नगर परीसरातील अमन पार्कजवळी बर्फाच्या कारखान्याजवळ राहणारे मुख्तार पांडे यांना दुपारी तीन वाजेच्‍या सुमारार हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीन उपचारासाठी खासगी रिक्षाने शहरात आणाण्यासाठी सुरत रेल्वे गेटकडून रूग्णालयात घेवून जात होते. मात्र रोजच्या प्रमाणे आज सुट्टीच्या दिवशीही वाहतूकीची रहदारी कमी असतांना देखील रेल्वे फाटक बंद होते. दरम्यान रेल्वे गेट बंद असल्यामुळे रिक्षा थांबून होती. दरम्यान त्यांचा उपचारापुर्वी मृत्यू झाला.

दोन दिवसापुर्वीदेखील अशी परिस्थिती निर्माण होवून एका महिलेचा मृत्यू झाला होता. शिवाजी नगरातील कमलबाई सुरेश सावदेकर वय ७९ यांची दुपारी ३ वाजेच्या सुमारास तब्बेत बिघडली. त्यांना उपचारासाठी शिवाजी नगर मधून वैद्यकीय उपचार घेण्यासाठी पर्याय रस्ता नसल्यामुळे उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी सुरत रेल्वे गेटवर ट्रॅफिकमुळे जवळपास एक तास उशीर झाल्यामुळे योग्य ते उपचार वेळेत मिळू न शकल्याने त्याचा मृत्यू झाला होता. आजच्या परिस्थीतीमुळे आणखी एक निरागस जिवाच्या बळी रेल्वे आणि संबंधित प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेल्याने नागरीकांमधून संताप व्यक्त होत आहे.

Add Comment

Protected Content