जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट; आज ३३४ रूग्ण, बाधितांचा आकडा ९ हजाराच्या पार

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढतच असून आज पुन्हा नवीन ३३४ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात विशेष म्हणजे जळगाव शहरासह पाचोरा आणि चाळीसगाव तालुक्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा नऊ हजाराच्या पार झाला आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात एकूण ३३४ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ९० रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. त्या खालोखाल पाचोरा आणि चाळीसगाव तालुक्यात प्रत्येकी ४० रूग्ण आढळले आहे. तर जळगाव ग्रामीण- ११, भुसावळ- १८, अमळनेर-१९, चोपडा-७, भडगाव-१४, धरणगाव-३२, यावल-१, एरंडोल-९, जामनेर-३२, रावेर-७, पारोळा-२, मुक्ताईनगर-७, अन्य जिल्ह्यातील- २ असे एकुण ३३४ रूग्ण आढळून आले आहे.

तालुकानिहाय आकडेवारी याप्रमाणे
जळगाव शहर-२३६४, जळगाव ग्रामीण- ४०३, भुसावळ-७७९, अमळनेर-६१६, चोपडा-६०८, पाचोरा-२८७, भडगाव-३५६, धरणगाव-४१७, यावल-४०१, एरंडोल-४४१, जामनेर-६००, रावेर-६१३, पारोळा-४३०, चाळीसगाव-३३४, मुक्ताइनगर-२८२, बोदवड-२२१, अन्य जिल्हा-३१ असे आकडेवारी आहेत. एकुण बाधितांचा आकडा ९ हजार १८३ वर पोहचली आहे.

दरम्यान, आजच्या बाधितांची संख्या मिळवली असता आजवर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ९१८३ इतका झालेला आहे. यातील ५८३४ रूग्ण बरे झाले आहेत. आज १९ रूग्णांचा मृत्यू झाले असून आजवरील मृतांची संख्या ४५० इतकी असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.

Protected Content