भरधाव रिक्षाची दुचाकीला धडक; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । अजिंठा रोडवरील आर.एल.चौफुली जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या रिक्षाचालकाने उजव्या बाजुला वळण घेतल्याने मागुन येत असलेल्या दुचाकी आढळल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील कसुंबा गावातील गणपती नगरात राहणारा शुभम सतिष पाटिल (वय-२७,रा.) हा तरुण शहरात खासगी नोकरी करुन कुटूंबाचा उदनिर्वाह चालवतो. मंगळवार १५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शुभम त्याच्या दुचाकीने कुसूंबा घराकडे येत असतांना अजिंठा रोडवरील आर.एल.चौफुली जवळ त्याच्या दुचाकीपुढे चालत असलेल्या ऑटो रिक्षाचालकाने कुठलेही इंडीकेटर न देता, हात न बाहेर काढता तशीच सुसाट वेगात ऑटोरिक्षा उजव्या बाजुला वळवली. त्यामुळे शुभम दुचाकीसह त्याच्या रिक्षावर आदळून गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या जबाबावरुन रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलिसात अज्ञात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस नाईक संजय धनगर तपास करत आहेत.

 

Protected Content