Home Cities जळगाव जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन

जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन

0
132


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे सुगर व ब्लड प्रेशर तपासणी शिबिर तसेच ब्लँकेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या उपस्थितीत मोफत सुगर व ब्लड प्रेशर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासोबत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले. गरीब बांधवांसाठी ब्लँकेट वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रदेश चिटणीस एजाज मलिक, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, राजू मोरे, सुनील माळी, सुशील कुमार शिंदे, रमेश बहारे, सलीम इनामदार, विशाल देशमुख, जयश्री पाटील, दिव्या भोसले, आरोही नेवे, दीपिका भामरे, अशोक सोनवणे, संजय जाधव, जितु बागरे, किरण चव्हाण, सूर्यकांत भामरे आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound